HBD Badshah : एकेकाळी हनी सिंगचा जवळचा मित्र असणाऱ्या बादशहाबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहीत आहे का ?

प्रतिनिधी

लाखो संगीत प्रेमींच्या गळ्यातील ताईत असलेला फेमस रॅपर बादशाह आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे.

बादशहाचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया असे आहे.

मात्र तो त्याच्या स्टेज नावाने म्हणजेच बादशाह या नावाने प्रसिद्ध असून तो त्याच्या हिंदी, हरियाणवी आणि पंजाबी संगीतासाठी ओळखला जातो.

डीजे वाले बाबू, गेंदा फूल, आणि पानी पानी यांसारख्या चार्टबस्टर रॅप आणि गाण्यांमधून तो लोकांच्या पसंतीस आला.

त्याने 2006 मध्ये यो यो हनी सिंगसोबत त्याच्या हिप हॉप ग्रुप माफिया मुंडेरमध्ये त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली.

तो 2012 मध्ये हनीसिंग पासून वेगळा झाला आणि त्याचे स्वतंत्र हरियाणवी गाणे 'कर गई चुल' हे रिलीज केले, जे नंतर 'कपूर अँड सन्स' या बॉलिवूड चित्रपटामध्ये स्वीकारले गेले.

2017, 2018 आणि 2019 मध्ये तो फोर्ब्स इंडियाच्या सेलिब्रिटी 100 मध्ये भारतातील सर्वाधिक कमाई करणारा आणि यादीतील एकमेव रॅपर म्हणून दिसला आहे.

नुकताच तो एमटीव्ही 'हसल २.०' या भारतातील पहिला रॅप/हिप-हॉप रिअॅलिटी शो जज करताना दिसला.