तुम्हाला ही सारखा अशक्तपणा येत आहे? 'हे' उपाय करा आणि फ्रेश राहा

Swapnil S

शुद्ध तुपात कांदा भाजून घ्यावा आणि त्याचे नियमितपणे सेवन करावे. यामुळे अशक्तपणा दूर होईल आणि फुप्फुसांना फायदा होईल. | PM
लिंबू आणि मोसंबीचा ज्यूस अशक्तपणा दूर करतो. यातील अँटिऑक्सिडंट्स प्रतिकारशक्ती बळकट बनवतात. | PM
दिवसभर ऊर्जा पातळी राखण्यासाठी मोड आलेले मूग आणि हरभर्‍याचे सेवन करावे. यामुळे थकवा दूर होईल. | PM
कामाच्या अधिक व्यापामुळे वेळेवर जेवण होत नाही. त्यामुळे जंक फूडचे सेवन अनेकजण करतात; परंतु जंक फूड खाण्याचे टाळावे. | PM
दिवसभरात भरपूर पाणी प्यावे. कारण शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे शरीराच्या स्नायूंना जास्त मेहनत करावी लागते. यामुळे व्यक्ती लवकर थकून जातो. | PM
दीर्घ काळापर्यंत उपाशी राहू नये. प्रत्येक दोन ते तीन तासांच्या अंतराने थोड्या-थोड्या प्रमाणात जेवण करीत राहावे. यामुळे पचन क्रिया चांगली राहील. जेवणानंतर लगेचच झोपू नये, यामुळे जास्त आळस येतो. | PM