हनीमूनवर जाण्यापूर्वी कधीच करू नका 'ही' चूक, नाहीतर...

Suraj Sakunde

विवाहानंतर हनिमूनचे क्षण प्रत्येक जोडप्यासाठी खूप खास असतात. | fpj
हनिमूनच्या माध्यमातून एकमेकाच्या सहवासात वेळ घालवता येतो. | fpj
परंतु बऱ्याचदा हनिमूनला जाण्यापूर्वी जोडपी काही चुका करतात. त्यामुळं त्यांना पुढं त्रासाला सामोरं जावं लागतं. | fjp
लग्नापूर्वी तुम्ही जशाप्रकारे प्लॅनिंग करता तसं प्लॅनिंग हनिमूनसाठी करू नये. | fpj
काही जोडप्यांना वाटतं की हनिमूनला जायचं म्हणजे फक्त फिरायला जाणं, पण असं अजिबात नाही. | fpj
तुमच्या साथीदारासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी जात असता, त्यामुळं नियोजन हे काटेकोरपणे हवं. | fpj
जर तुम्ही हनिमून डेस्टिनेशन ठरवलं असेल, तर बुकिंग करण्यास अजिबात उशिर करू नका. | fpj
तुमच्या साथीदाराशी बोलून तिकीट्स लवकरात लवकर बुक करा. | fpj
ऐन मोक्यात घाईगडबडीत तिकीट बुक केल्यास त्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागू शकते. | fpj
बऱ्याचदा असं होतं की पती आपल्या पत्नीला सरप्राइज देण्यासाठी सगळं प्लॅनिंग स्वतःच करतो. | fpj
परंतु नंतर पत्नीला ते न आवडल्यास पश्चातापाची वेळ येते आणि सर्व खर्चही वाया गेल्याची भावना होते. | fpj
यापेक्षा तुम्ही तुमच्या साथीदारासोबत या गोष्टींची चर्चा करा आणि प्लॅनिंगमध्ये त्यांनाही सहभागी करून घ्या. | fpj