Dussehra 2026 : पदरावर कमळाची नक्षी अन् रंगांची आकर्षक उधळण; लोटस पैठणीने खुलवा सणासुदीचं सौंदर्य
किशोरी घायवट-उबाळे
दसऱ्याच्या सणासाठी पारंपरिक आणि रॉयल लूक हवा असेल, तर सध्या ट्रेंडमध्ये असलेली लोटस पैठणी साडी तुमच्यासाठी खास पर्याय ठरू शकते.
पारंपरिक पैठणीपेक्षा वेगळी ओळख असलेल्या या साडीच्या काठावर आणि पदरावर कमळाच्या फुलांची आकर्षक नक्षी पाहायला मिळते.
लाल रंगाची कॉन्ट्रास्ट बॉर्डर आणि त्यावरील बहुरंगी कमळांची नक्षी साडीला राजेशाही थाट देते.
साडीवर असलेल्या छोट्या सोनेरी बुटी आणि कमळाच्या फुलांची डिझाईन तिचे सौंदर्य अधिक खुलवते.
दिसायला भरजरी आणि आकर्षक असलेली लोटस पैठणी साडी हलकी असल्याने ती नेसायला आरामदायक ठरू शकते.
दसऱ्याच्या पूजेसाठी किंवा कुटुंबीयांसोबत सणाच्या खास क्षणांसाठी ही साडी पारंपरिक लूकला आधुनिक टच देते.
पिवळा, केशरी आणि सोनेरी अशा उठावदार रंगांमधील लोटस पैठणी सणासुदीच्या लूकला खास रंगत आणते.
लोटस पैठणीसोबत पारंपरिक दागिने, नथ, बांगड्या आणि सुंदर हेअरस्टाइल केल्यास तुमचा सणासुदीचा लूक अधिक खुलून दिसेल.
यंदाच्या दसऱ्याला नेहमीच्या साडीपेक्षा काहीतरी हटके आणि स्टायलिश परिधान करायचे असेल, तर कमळाच्या नक्षीची लोटस पैठणी नक्की ट्राय करा.