हार्ट अटॅक येण्याच्या महिनाआधी शरीर देतं 'हे' संकेत, चुकूनही करु नका दुर्लक्ष
Krantee V. Kale
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे हृदयाशी संबधित आजारांचा धोका वाढला आहे. | All Photos- Yandex
गेल्या काही वर्षांमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू पावणाऱ्या लोकांची संख्या वाढली आहे. परंतु, हृदयाशी संबधित आजारांची लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर उपचार केले जाऊ शकते.
कोणतेही काम न करता किंवा आराम करुन देखील शरीरात सतत थकवा जाणवत असेल तर हे हार्ट अटॅकचे लक्षण आहे.
श्वास घेण्यास त्रास होणे हे हार्ट अटॅकचे सुरुवातीचे लक्षण आहे. हार्ट अटॅक येण्याआधी शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
अचानक चक्कर येणे किंवा ब्लड प्रेशर वाढणे हे देखील हार्ट अटॅकचे लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
जर तुमच्या शरीरातही अशी लक्षणे दिसत असतील त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.