Pedicure At Home : घरच्या घरी करा पेडीक्यूअर! फक्त काही सोप्या स्टेप्स अन् पाय होतील मऊ, गोरे, सुंदर

Mayuri Gawade

आपला चेहरा जितका महत्त्वाचा, तितकेच हात-पायांचे सौंदर्यही आवश्यक असते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
धूळ, ऊन आणि प्रदूषणामुळे पाय काळवंडतात आणि नखं खराब होतात.
पार्लरमध्ये पेडीक्यूअर करण्यासाठी ५०० ते ७०० रुपये खर्च करण्यापेक्षा घरच्या घरी सोप्या पद्धतीने हे करता येते.
यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घेऊन त्यात मीठ, बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळा आणि त्यात पाय १० मिनिटं भिजवा.
नंतर स्क्रबरने घासून पायावरची डेड स्किन काढा.
त्यानंतर इनो, टूथपेस्ट आणि लिंबाचा रस एकत्र करून तयार केलेले मिश्रण लिंबाच्या सालीवर घ्या आणि त्या सालीने पाय चोळा.
नखं जुन्या मऊ ब्रशने स्वच्छ करा.
त्यानंतर साय आणि लिंबाचा रस एकत्र करून पायांना मसाज करा आणि पाणीने धुवा.
शेवटी नखांना शेप देऊन आवडती नेलपेंट लावा.
आठवड्यातून एकदा असा पेडीक्यूअर केल्यास पाय नेहमी स्वच्छ, मऊ आणि आकर्षक राहतात.