ऑफिसमध्ये दिवसभर बसूनही पोट होईल कमी! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

किशोरी घायवट-उबाळे

दर ९० मिनिटांनी जागेवरून उठा - सतत बसून राहण्याऐवजी दर दीड तासांनी ५ मिनिटे चाला किंवा स्ट्रेचिंग करा. | (छायाचित्रे: Yandex)
पुरेसे पाणी प्या - डेस्कवर पाण्याची बाटली ठेवा आणि तासाला किमान एक ग्लास पाणी पिण्याची सवय लावा.
संध्याकाळची भूक हेल्दी पद्धतीने भागवा - ३ ते ५ वाजता बिस्किटे किंवा वेफर्सऐवजी मखाणा, भाजलेले चणे किंवा एखादे फळ खा.
नाश्त्यानंतर थोडे चालणे आवश्यक - नाश्ता झाल्यावर लगेच बसू नका. १० मिनिटे चालल्याने पचन सुधारते.
लिफ्टऐवजी जिने वापरा - दररोज जिन्यावरुन चढ-उतार केल्याने अतिरिक्त कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
बसण्याची योग्य पोश्चर ठेवा - सरळ बसल्याने पोटाचे स्नायू सक्रिय राहतात आणि शरीराचा ताण कमी होतो.
जेवण शांतपणे आणि हळूहळू करा - घाईघाईने खाण्याऐवजी अन्न व्यवस्थित चावून खाल्ल्याने जास्त खाणे टाळता येते.
दिवसभर सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा - फोनवर बोलताना चालणे किंवा छोट्या-छोट्या हालचाली केल्याने कॅलरी बर्न होण्यास मदत होते.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)