Healthy Lifestyle : दिवसभरात चालण्यासाठी वेगळा वेळ नाही? मग असं पूर्ण करा स्टेप्स टार्गेट

Mayuri Gawade

फिट राहण्यासाठी तासन्‌तास जिममध्ये जाण्याची गरज नाही; चालण्याची सवयही पुरेशी ठरू शकते.
लिफ्टऐवजी जिन्याचा वापर केल्याने रोजच्या स्टेप्स सहज वाढतात.
फोनवर बोलताना बसून न राहता चालत बोलण्याचा प्रयत्न करा.
घरातील छोटी-मोठी कामे स्वतः केल्याने शरीर अधिक सक्रिय राहते.
जवळच्या ठिकाणी जाताना वाहनाऐवजी चालत जाण्याची सवय लावा.
ऑफिसमध्ये दर तासाला काही मिनिटे उठून चालल्याने थकवा कमी होतो.
टीव्ही पाहताना जाहिरातींच्या वेळेत थोडं चालणं किंवा स्ट्रेचिंग करणं फायदेशीर ठरतं.
स्टेप्स काऊंट मोजणारे अ‍ॅप वापरल्याने रोज अधिक चालण्याची प्रेरणा मिळते.
मुलांसोबत खेळणे, पाळीव प्राण्यासोबत फिरणे किंवा कुटुंबासोबत फेरफटका मारणे हेही स्टेप्स वाढवण्याचे सोपे मार्ग आहेत. | All Photos : Ai generated