जेवण झाल्यावर लगेच फळं खाताय? मग ही माहिती एकदा वाचाच
Mayuri Gawade
जेवल्यानंतर लगेच फळं खाण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरेलच असं नाही.
जेवल्यावर लगेच फळं खाल्ल्यास पचनक्रिया मंदावू शकते.
फळं आणि जेवण एकत्र पचवताना गॅस किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
फळं खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेवणाच्या किमान १ तास आधी.
जेवणानंतर फळं खायची असल्यास २ ते ३ तासांचा अवधी ठेवा.
वजन कमी करायचं असल्यास जेवणाआधी फळं खाण्याची सवय लावा.
जेवणाआधी फळं खाल्ल्याने जास्त भूक लागण्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.
सकाळी उपाशीपोटी फळं खाल्ल्यास शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते.
योग्य वेळी फळं खाल्ल्यास त्यांचे पोषणमूल्य आणि फायदे अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात.
ही माहिती सामान्य आरोग्यविषयक माहितीसाठी असून आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. | All Photos : Ai Generated