फक्त टाइम पास म्हणून खाता भुईमुगाच्या शेंगा? फायदे वाचाल तर थक्क व्हाल!

Swapnil S

भुईमूगाच्या शेंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रोटिन्स असतात, असे एक रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. त्यामध्ये कॅलरीज कमी असतात, ज्यामुळे भुईमुगाच्या शेंगा शरीर तंदुरुस्त ठेऊन वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. | PM
मेंदूसाठीही फायदेशीर भुईमुगाच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी 1, नियासिन आणि फोलेट सारखी पोषकतत्व असतात, जे आपला मेंदू निरोगी आणि तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात. संशोधनात असे आढळले आहे की, शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने मेंदू अधिक सक्रिय आणि तीक्ष्ण होतो | PM
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर हृदय निरोगी ठेवण्यासाठी भुईमूगाच्या शेंगा फायदेशीर ठरू शकतात. कारण या शेंगांमध्ये उंसाच्युरेटेड फॅट्सचे प्रमाण जास्त असते, जे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि त्याच्याशी संबंधित समस्या कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. | PM
भुईमूगाक्सच्या शेंगा व्हिटॅमिन डीचा समृद्ध स्रोत आहे. यामध्ये मॅंगनीज आणि फॉस्फरसदेखील असते, जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतात. | PM
व्हिटॅमिन बी 1 अल्झायमर सारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. | PM