रोज सकाळी खा 'या' ६ गोष्टी, बुद्धी होईल तल्लख

Suraj Sakunde

वाढत्या वयानुसार आपली स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपल्या आहारावर विशेष लक्ष द्यायला हवं.

आज आम्ही तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचं सेवन केल्यानं तुमची बुद्धी तल्लख होईल.

बुद्धी तल्लख करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भोपळ्याच्या बियांचा समावेश करू शकता. त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि झिंक विपुल प्रमाणात असतं.

अंड्याचं सेवन रोज केल्यानं बुद्धी तेज होते.

तुम्ही रोज सकाळी ब्लूबेरी आपल्या आहारात घेऊ शकतात. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात.

बुद्धीसाठी ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि झिंकनं समृद्ध अशी ड्रायफ्रुट्स खाणं फायदेशीर ठरतं.

स्मरणशक्ती वाढवायची असेल तर दररोज ताज्या फळांचं सेवन करू शकता.