ऑफिसमध्ये कामामुळे जेवायला वेळ मिळत नाही? 'या' पदार्थांनी करा थकवा दूर!

Swapnil S

केळी :- केळी जीवनसत्त्वे, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि फायबरचा उत्कृष्ट स्रोत मानली जातात. याशिवाय त्यात अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मही असतात. केळी हे पूर्ण अन्न मानले जाते. दोन ते तीन केळी खाल्ल्याने पोट तर भरतेच पण त्याचबरोबर शरीराला ऊर्जाही मिळते.
सफरचंद :- सफरचंदात भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. सफरचंद खाल्ल्याने अनेक रोगांचा धोका टाळता येतो. सफरचंद खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ऊर्जाही मिळते.
तुळस :- पुरेशी झोप घेऊनही दिवसभर थकवा जाणवत असेल आणि त्यामुळे काम करावंसं वाटत नसेल, तर तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने ही तक्रार दूर करू शकता. तुळशीची पाने चहा किंवा पाण्यात उकळून प्यायल्याने अशक्तपणा, थकवा दूर होतो आणि रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
मनुका :- सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्स आढळतात. याचा अर्थ, जर तुम्ही हेल्दी पद्धतीने वजन वाढवण्याचा विचार करत असाल तर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स कमी प्रमाणात खा. उर्जेसाठी मनुके नक्कीच खा.
डाळिंब :- आपल्याला झटपट ऊर्जा देणाऱ्या फळांमध्ये डाळिंबाचाही समावेश होतो. खरंतर, शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा येतो आणि डाळिंब खाल्ल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते, ज्यामुळे या दोन्ही समस्या दूर होतात.
तूप :- जास्त प्रमाणात तूप खाल्ल्याने लठ्ठपणा वाढतो. पण, मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. शरीराची ताकद आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तूप खाणे फायदेशीर आहे. मात्र, तूप केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे.