विटामिन 'सी' रोज खा आणि निरोगी व्हा! जाणून घ्या सविस्तर

Swapnil S

विटामिन 'सी' मुळे आपल्या शरीरातील पेशींच्या वाढीचे कार्य सुरळीत सुरू राहते. याव्यतीरिक्त विटामिन 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, जास्तीच्या लोहाचा शरीराला पुरवठा करण्यासाठी, जखम लवकर भरून येण्यासाठी, तोंडाच्या आरोग्यासोबतच हाडांसाठी उपयुक्त मानले जाते. | PM
लिंबू हा विटामिन सी चा सर्वात मोठा आणि चांगला घटक मानला जातो. याच कारणामुळे बहुतांश लोक जेवनानंतर लिंबू पाण्यात पिळून पितात. विटामिन सी मिळवण्यासाठी तुम्ही लिंबूचा अनेक प्रकारे रोजच्या आहारात समावेश करू शकता. काही लोक लिंबू सरबत करून याचे सेवन करतात. तर काही लोक डाळ-खिचडी मध्ये लिंबाचा रस पिळून जेवणाचा स्वाद वाढवण्यासोबतच विटामिन सी मिळवतात. | PM
पालकच्या भाजीमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते. पालकच्या भाजीला हिमोग्लोबिन वाढवण्याच्या दृष्टीने एक गुणकारी पालेभाजी मानली जाते. परंतु फार कमी लोकांना हे माहिती असावे की, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी विविध औषधी गुण देखील आढळून येतात. पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. पालकात जे गुण आढळून आले आहे ते सामान्य भाज्यांमध्ये सापडत नाही. हेच कारण आहे की पालक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी, सर्वसुलभ आणि स्वस्त आहे. पालक या पालेभाजीमध्ये कॅरोटिन, फॉलिक ऍसिड, “क’ जीवनसत्त्व असल्याने गर्भवती महिलांसाठी देखील ही भाजी अत्यंत आरोग्यदायी आहे. | PM
संत्री प्रत्येक ऋतूत मिळणारे फळ आहे. भरपूर विटामिन सी असलेल्या पदार्थांपैकी संत्री हे एक फळ महत्वाचे मानले जाते. त्वचा उजळण्यासाठी आणि सी जीवसत्व मिळवण्यासाठी संत्री खूप लाभदायक मानली जातात. संत्री हे फळ चवीने आंबट गोड स्वरूपाचे असते. या फळाचा रंग प्रामुख्याने नारंगी असतो त्यामुळे त्याला 'नारंगी' या देखील नावाने ओळखले जाते. | PM
कीवी हे असं फळ आहे जे आपल्याला प्रत्येक ऋतुमध्ये सहजपणे मिळते. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासोबतच कीवी आपल्या शरीरास ब-याच प्रकारचे पोषक तत्वही देते. विटामिन सी पुरवणा-या ताज्या फळांमध्ये कीवीचं नाव आवर्जुन घेतलं जातं. कीवीमधील पोषक तत्वे डिप्रेशन दूर करण्यास मदत करतात. हृदयाचे आरोग्य राखण्यासाठीही कीवीचा फायदा होतो. कीवीमध्ये नैसर्गिकरित्या रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण अधिक असलेल्यांसाठी हे फळ उपयुक्त आहे. | PM
पेरू तर लहानांपासून मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो. सहसा लोक पेरूला चटणी-मीठ लावून खातात. पेरूमध्ये जवळ जवळ १२६ मिलीग्राम विटामिन सी चा समावेश असतो. तुम्ही पेरूचे सलाडच्या स्वरूपात किंवा स्मुदी बनवूनही सेवन करू शकता. इतकंच नाही तर पेरूमधील मॅग्नेशिअमचे प्रमाण रक्ताभिसरणाचे कार्य संतुलित राखण्यासही मदत करते. | PM