रोज काजू खाल्याने आरोग्याला मिळतील 'हे' फायदे!

Swapnil S

काजूमध्ये कॉपर आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच काजूमध्ये सेलेनिअम, झिंक (जस्त), मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. या सर्व पोषक तत्वांमुळे आपली त्वचा हेल्दी राहण्यास मदत करतात. काजूमधील पोषक तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे त्वचा तंदुरुस्त होते आणि चमकदार बनते. | PM
नियमिपणे काजूचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. त्यामुळे चरबी कमी होते. काजू खाल्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटेल. वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल, तर तुम्ही त्यामध्ये काजूचा समावेश करू शकता. | PM
मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काजूमध्ये मॅग्नेशिअम तसेच जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच काजूचे सेवन केल्यामुळे मायग्रेनच्या त्रास कमी होतो. | PM
काजूमध्ये ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी त्यापासून संरक्षण मिळत. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते.
PM
काजू खाण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे, त्यामुळे कर्करोगाचा (कॅन्सर) धोका कमी होण्यास मदत मिळते. काजूमध्ये प्रोएंथोसायनिडिन असते, जे शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यापासून रोखते. हे कॅन्सरपासून संरक्षण करण्याचे काम करते. हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तुम्ही नियमितरित्या काजूचे सेवन करू शकता. | PM