वेगवेगळ्या कारणांमुळे येणाऱ्या ताणतणावाचा आपल्या शारीरिक आरोग्यावरही भरपूर दुष्परिणाम होतात. चिंता, ताणतणावामुळे शरीर जड होणे तसंच कित्येक तास एकाच ठिकाणी बसून काम केल्याने स्नायूंची हालचाल योग्य पद्धतीने होत नाही. यामुळे आरोग्याशी संबंधित अन्य समस्या देखील उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी मध अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका निभावू शकतं. कारण मधामध्ये नैसर्गिक स्वरुपात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. ग्लुकोजमुळे शरीराचा थकवा दूर होण्यास मदत मिळते. | PM