भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे आहेत मोठे फायदे; जाणून घ्या सविस्तर

Swapnil S

सुकामेव्यामुळे आपल्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. यातील घटक आपल्या मेंदूसाठी उपयुक्त असतात. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-3 फॅटी एसिड आहे. या गुणधर्मामुळे मेंदूची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. यामुळे डॉक्टारांचा सल्ला घेऊन मुलांच्या आहारामध्ये शेंगदाण्यांचा समावेश करावा. जेणेकरून त्यांच्या मेंदूची वाढ योग्य प्रकारे होईल. शेंगदाण्यांतील औषधी गुणांमुळे मुलांच्या स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. | PM
जेवणानंतर तुम्ही ५० किंवा १०० ग्रॅम शेंगदाण्यांचे सेवन केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच ही प्रक्रिया करावी. शिवाय शरीरातील रक्तही वाढते. | PM
हृदयविकारांपासून आपले संरक्षण होईल, असे उपयुक्त गुणधर्म शेंगदाण्यांमध्ये आहेत. संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार शेंगदाण्यांमध्ये कार्डिओप्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत. जे लोक आपल्या आहारामध्ये नियमित स्वरुपात कार्डिओप्रोटेक्टिव्हयुक्त खाद्य पदार्थांचे सेवन करतात, त्यांनी आपल्या आहारात शेंगदाण्याचाही समावेश करावा. कार्डिओप्रोटेक्टिव्ह हा एक असा घटक आहे, ज्यामुळे हृदयविकाराशी संबंधित आजारांचा धोका कित्येक पटीनं कमी होण्यास मदत मिळते. | PM
फायबरमुळे शरीराची पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. पचनसंस्थेसाठी हा पोषक घटक अतिशय महत्त्वाचा आहे. यामुळे आपल्या आहारामध्ये नियमित स्वरुपात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करावा. शेंगदाण्यांमध्येही भरपूर प्रमाणात फायबरचे गुणधर्म आहेत. शेंगदाण्यांच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे दुखणे कमी होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे शेंगदाण्यांमुळे वजन कमी होते. कारण यातील पोषक घटकांमुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. | PM
प्रत्येक जण आपली त्वचा चमकदार आणि सुंदर दिसण्यासाठी कित्येक प्रकारच्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करत असतात. महागडे ब्युटी प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही भिजवलेल्या शेंगदाण्यांचे सेवन केले तर तुमच्या त्वचेला कित्येक प्रकारे फायदा होऊ शकतो. शेंगदाण्यांमध्ये अँटी-ऑक्सिडेंटचे घटक आहेत. याच कारणामुळे जर तुम्ही सकाळी शेंगदाण्यांचे सेवन केलं तर त्वचेवर नैसर्गिक स्वरुपात तेज येण्यास मदत होईल.