'ही' गोष्ट खाल्ल्याने नीरज चोप्राचे टेन्शन होते दूर

Tejashree Gaikwad

भारताचा स्टार चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये रौप्यपदक जिंकले आणि २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. | Credit: DD Sports Twitter
ॲथलीट असल्याने नीरज चोप्रा त्याच्या फिटनेसवरही विशेष लक्ष ठेवतो. | @neeraj____chopra/ Instagram
नीरज चोप्रा फिटनेस नीरज चोप्राने एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की तो दिवसातून किमान ७-८ तास वर्कआउट करतो आणि ४ ते ५ हजार कॅलरीज घेतो. | Instagram
नीरज चोप्राला मिठाई आवडते आणि कधीकधी आईस्क्रीमसोबत गुलाब जामुन खायला त्याला आवडते, हे त्यांच चिट मिल आहे.
नीरज चोप्राने एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तो देसी स्टाईलमध्ये चहासोबत चपाती खाताना दिसत आहे, त्या पोस्टला त्याने 'रोटी खा, चहा प्या, टेन्शनला बाय म्हणा' असे कॅप्शन लिहिले आहे.
नीरज चोप्रा प्रशिक्षणादरम्यान केळी, ज्यूस, नारळपाणी, ड्रायफ्रूट्स घेतो आणि प्रशिक्षणानंतर १० ते १५ मिनिटे प्रोटीन शेक घेतो.
नीरज चोप्रा नाश्त्यात फळे, कोशिंबीर, दही, ओट्स, अंडी यासारख्या गोष्टी घेतो, तर दुपारच्या जेवणात डाळी, दही, भाज्या, कोशिंबीर, रोटी किंवा भात आणि प्रोटीनयुक्त मांसाहारी पदार्थ असतात. | @neeraj____chopra/ Instagram