तुम्हालाही रिकाम्या पोटी चहा पिण्याची सवय आहे? आरोग्यासाठी ठरेल घातक, जाणून घ्या गंभीर परिणाम

Krantee V. Kale

हिवाळ्यात अनेकजण आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे पसंत करतात. | All photos- Yandex
परंतु, तुम्हाला माहित आहे का रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने आरोग्यावर कोणता परिणाम होतो, जाणून घ्या.
ज्या लोकांना सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याची आवड आहे त्यांच्यात पोषक तत्वांची कमतरता असू शकते. यामुळे अशक्तपणा आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
किडनी हे आपल्या शरीरातील एक महत्त्वाचे अवयव आहे. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. म्हणून,सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने किडनीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
चहामध्ये टॅनिन आणि कॅफिनसारखे घटक असतात. म्हणून, सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने गॅस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने हदृयाशी संबधित आजार देखील होऊ शकतात. म्हणून, निरोगी हृदय राखण्यासाठी, रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे.
जर तुम्हाला वारंवार पोटदुखी होत असेल तर सकाळी रिकाम्या पोटी चहा पिणे टाळावे. यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
सकाळी रिकाम्या पोटी चहा पिण्याऐवजी तुम्ही बदाम, चिया सीड्स, गाजराचा रस, मनुका, ओट्स उपमा, अंडा भुर्जी आणि मेथीचे दाणे इत्यादींचे सेवन करू शकता.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)