Environment Day 2026 : लहानपणापासून मुलांना शिकवा 'या' इको-फ्रेंडली सवयी

किशोरी घायवट-उबाळे

पाण्याची बचत करणे - दात घासताना किंवा हात धुताना नळ बंद ठेवण्याची सवय मुलांना लावावी.
झाडं लावणे आणि त्यांची काळजी घेणे - मुलांना नियमित झाडांना पाणी घालण्याची आणि पर्यावरणाशी जोडून घेण्याची सवय शिकवावी.
कचऱ्याचे वर्गीकरण - ओला आणि सुका कचरा वेगळा ठेवण्याची सवय मुलांना लहानपणापासून शिकवावी.
प्लास्टिकचा कमी वापर - प्लास्टिक बॅगऐवजी कापडी पिशवी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वापरण्यास प्रोत्साहन द्यावे.
वीज वाचवणे - गरज नसताना लाईट, फॅन किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू बंद करण्याची सवय लावावी.
कागदाचा योग्य वापर - कागदाच्या दोन्ही बाजू वापरणे आणि अनावश्यक प्रिंट टाळणे, यामुळे झाडांची बचत होते हे मुलांना समजवावे.
या छोट्या पण महत्त्वपूर्ण सवयी लहान मुलांच्या भविष्यासाठी सोयीच्या ठरतील.