ईशा गुप्ताने गोल्डन सिल्क साडीत दिली वाराणसीला भेट

Swapnil S

ईशा ही भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि २००७ च्या मिस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धेची विजेती आहे. तिने हिंदी, तेलुगू तसेच तमिळ भाषेतील चित्रपटात, अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
ईशा गुप्ताने नुकतेच तिचे गोल्डन साडीतले वाराणसीमधील काही फोटोस सोशल मीडियावर शेयर केले आहेत. ईशा ही सध्या उत्तर प्रदेश, वाराणसीमध्ये आहे.
तिने पायामध्ये पैंजण घालून "उस की याद आई है साँसो ज़रा आहिस्ता चलो धड़कनों से भी इबादत में ख़लल पड़ता है" असे कॅप्शन फोटोसला दिले आहे.
ईशाने २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत प्रवेश केला होता .जिथे तिने तिसरे स्थान पटकावले आणि मिस इंडिया इंटरनॅशनल खिताब जिंकला आणि नंतर मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले.
ईशाच्या या फोटोस वर सुंदर,सुरेख अश्या अनेक कंमेंट्सचा वर्षाव केला
ईशाने अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे . २०१३ च्या व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट 'जन्नत 2' मध्ये तिने अभिनयात पदार्पण केले आहे.