ना वजन वाढणार, ना पोट सुटणार! जेवणानंतर फक्त ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम

Mayuri Gawade

जेवणानंतर फक्त ५ मिनिटे केलेले काही सोपे व्यायाम पचनक्रिया, चयापचय आणि शरीराची हालचाल सुधारण्यास मदत करू शकतात. वाढलेलं पोट आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी हे सोपे उपाय जाणून घ्या.
जेवण झाल्यानंतर ताठ उभे राहा आणि एक पाय गुडघ्यातून मागे दुमडून त्याला त्याच बाजूच्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
यानंतर दुसऱ्या पायानेही हाच व्यायाम करा. दोन्ही पाय आलटून-पालटून हलवल्याने शरीर सक्रिय राहण्यास मदत होते.
पुढच्या टप्प्यात उजवा पाय मागे दुमडून डाव्या हाताने आणि डावा पाय मागे दुमडून उजव्या हाताने स्पर्श करण्याचा प्रयत्न करा.
हे दोन्ही व्यायाम साधारण पाच मिनिटे नियमित केल्यास पचनक्रिया आणि चयापचय सुधारण्यास मदत होऊ शकते.
याशिवाय दोन्ही टाचा उचलून फक्त पायांच्या बोटांवर पाच मिनिटे चालण्याचाही सराव करू शकता.
त्यानंतर टाचा जमिनीवर टेकवून पायाची बोटे वर उचला आणि काही मिनिटे टाचांवर चालण्याचा प्रयत्न करा.
या हालचालींमुळे पायांच्या स्नायूंवर ताण येतो, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर अधिक सक्रिय राहण्यास मदत मिळते.
हे व्यायाम नियमित करण्यासोबत संतुलित आहार आणि सक्रिय जीवनशैलीही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे आणि पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी अधिक चांगला परिणाम मिळू शकतो. | All Photos : AI Generated