बारीक डोळेही दिसतील टपोरे! काजळ-आयलाइनर लावताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Mayuri Gawade

डोळे आकाराने बारीक असतील तर योग्य आय मेकअपने ते अधिक टपोरे आणि उठावदार दिसू शकतात
डोळ्यांच्या संपूर्ण कडेला जाड काजळ लावण्याऐवजी ते मोजक्याच भागात लावल्यास डोळे अधिक मोठे भासतात.
डोळ्यांच्या नाकाकडील कोपऱ्यात काजळाचा छोटासा अँगल दिल्यास डोळ्यांचा आकार अधिक खुलून दिसतो.
काजळाची रेषा डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यापासून थोडी वरच्या दिशेने नेल्यास डोळ्यांना लिफ्टेड लूक मिळतो.
बाहेरील कोपऱ्यातील काजळ स्पंजने हलके ब्लेंड केल्यास डोळ्यांना सुंदर स्मोकी आणि मोठा लूक मिळतो.
लहान डोळ्यांसाठी आयलाइनर लावताना रेषा खूप जाड न ठेवता ती बारीक आणि नेटक्या पद्धतीने काढा.
वरच्या पापणीच्या कडेला काजळाची पेन्सिल हलकी फिरवल्यास डोळ्यांचा आकार अधिक स्पष्ट आणि आकर्षक दिसतो.
काजळ आणि आयलाइनरचा योग्य वापर केल्यास बारीक डोळेही मेकअपनंतर अधिक पसरट आणि टपोरे दिसू शकतात.
फेस्टिव्ह सीझनमध्ये हा साधा आय मेकअप ट्राय करून तुमच्या डोळ्यांना अधिक उठावदार लूक देता येईल. | All Photos : AI Generated