Eyeliner दिवसभर टिकवायचं आहे? ट्राय करा या ३ सोप्या ट्रिक्स!
Mayuri Gawade
मेकअप हा प्रत्येक स्त्रीसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यात आयलायनरला तर विशेष महत्व आहे.. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
डोळ्यांचा लूक आकर्षक बनवण्यासाठी आयलायनर हा मेकअपमधला एक अत्यंत महत्वाचा घटक आहे.
तो फक्त डोळ्यांना आकार देत नाही, तर संपूर्ण फेस लूकला उठावदार बनवतो. म्हणूनच प्रत्येक मुलीच्या मेकअप किटमध्ये आयलायनर असते.
मात्र, बर्याच वेळा आयलायनर लगेच फिकट होतो किंवा पुसटतो, ज्यामुळे डोळ्यांचा लूक अर्धवट दिसतो.
आयलायनर जास्त काळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत, ज्या प्रत्येक मेकअप प्रेमींनी जाणून घेतल्या पाहिजेत.
१. आयलायनर लावण्यापूर्वी डोळे प्राइमर आणि लूज पावडरने सेट करा, त्यामुळे तो जास्त काळ टिकतो आणि डोळे सुंदर दिसतात.
२. डोळ्यांवर मॅट कन्सीलर लावा, ब्लेंडरने सेट करा आणि नंतर आयलायनर वापरा; त्यामुळे तो जास्त काळ टिकतो आणि लूक उठावदार राहतो.
३. पातळ आयलायनर लवकर फिकट होतो, म्हणून तो थरांमध्ये लावा; यामुळे आयलायनर जास्त काळ टिकतो आणि डोळे उठावदार दिसतात.
या सोप्या टिप्स अवलंबल्यास तुम्ही दिवसभर डोळ्यांचा लूक ताजा आणि आकर्षक ठेवू शकता.