एक्स, फेसबुक आणि इंस्टाग्रामप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर देखील मिळेल ब्ल्यू टिक, जाणून घ्या प्रोसेस

Swapnil S

आता इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे व्हॉट्सअ‍ॅपवर देखील ब्ल्यू टिक मिळेल. हे छोटं चिन्ह आहे ज्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटची ओळख पटते. परंतु ब्ल्यू टिक सहज मिळवता येणार नाही. ही फक्त व्हॉट्सअ‍ॅपच्या बिजनेस अकाऊंट्ससाठी असेल. म्हणजे जर तुम्ही एखाद्या दुकान किंवा कंपनीशी व्हॉट्सअ‍ॅपवर बोलत असाल तर त्यांच्याकडे ब्ल्यू टिक असू शकते.
कशी मिळणार ब्ल्यू टिक ही बातमी व्हॉट्सअ‍ॅपइन्फो नावाच्या वेबसाइटनं दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आगामी अपडेट्ससोबतच व्हॉट्सअ‍ॅपवर एक नवीन फीचर येईल, ज्यामुळे काही बिझनेस अकाऊंट्सना ब्लू टिक मिळू शकेल. जेव्हा हा अपडेट येईल, तेव्हा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप बिजनेस अकाऊंटच्या सेटिंग्समध्ये एक नवीन पर्याय दिसू लागेल, ज्याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं अकाऊंट व्हेरिफाय करू शकाल.
व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असेल? एक्सप्रमाणे, व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाऊंट्सना ब्ल्यू टिक मिळू शकेल. परंतु त्यासाठी एक प्रोसेस फॉलो करावी लागेल. ही प्रोसेस पूर्ण केल्यावर तुम्हाला काही शुल्क देखील द्यावं लागू शकतं. अद्याप हे शुल्क किती असेल याची माहिती मात्र मिळाली नाही. हे एकदाच आकारलं जाईल की एक्स, इंस्टाग्राम आणि फेसबुक प्रमाणे दरमहा सबस्क्रिप्शन असेल ते देखील समजलं नाही. | PM
कशी मिळवायची ब्ल्यू टिक? व्हॉट्सअ‍ॅपवर ब्ल्यू टिक मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे एक बिझनेस अकाऊंट असलं पाहिजे. परंतु हे ऑप्शनल देखील आहे, व्हेरिफिकेशनमुळे तुमचं अकाऊंट जास्त विश्वासार्ह दिसण्यास मदत होऊ शकते. विशेष म्हणजे व्हेरिफिकेशनविना देखील तुम्ही तुमचं व्हॉट्सअ‍ॅप बिझनेस अकाऊंट वापरू शकता. व्हॉट्सअ‍ॅप बिजनेस अकाऊंट्सच्या माध्यमातून कंपन्या जास्त चांगला आणि सुरक्षित अनुभव देऊ शकतील. | PM