फेशियल केलं, पण ग्लो २-३ दिवसांतच गायब? 'या' चुका अजिबात करू नका
Mayuri Gawade
फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर आलेला ग्लो जास्त काळ टिकवायचा असेल तर त्यानंतरची त्वचेची काळजीही तितकीच महत्त्वाची आहे.
फेशियलनंतर पहिल्या २४ तासांत त्वचेवर हार्श फेसवॉश किंवा क्लिन्झर वापरणे टाळा आणि शक्यतो साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा.
फेशियलनंतर सॅलिसिलिक ॲसिडसारखे घटक असलेले फेसवॉश किंवा क्लिन्झर लगेच वापरण्याऐवजी त्वचेला थोडा आराम द्या.
फेशियलनंतर त्वचा कोरडी पडू नये यासाठी सौम्य मॉईश्चरायझर लावून त्वचा हायड्रेटेड ठेवण्याची काळजी घ्या.
फेशियल केल्यानंतर पहिल्या काही तासांत शक्यतो थेट उन्हात जाणे टाळा, कारण त्यावेळी त्वचा अधिक संवेदनशील वाटू शकते.
बाहेर जाणे गरजेचे असल्यास चेहरा थेट उन्हापासून झाकून ठेवा आणि त्वचेच्या प्रकारानुसार सनस्क्रीनचा वापर करा.
फेशियलनंतर लगेच चेहऱ्यावर वेगवेगळे सौंदर्यप्रसाधने किंवा घरगुती उपाय करून प्रयोग करण्याऐवजी त्वचेला शांत राहू द्या.
फेशियलनंतर २ ते ३ दिवस चेहरा खूप गरम पाण्याने धुणे टाळा आणि त्वचेवर अनावश्यक घर्षण होणार नाही याची काळजी घ्या.
फेशियलवर पैसे खर्च केल्यानंतर त्याचा परिणाम जास्त काळ टिकवायचा असेल तर सुरुवातीचे काही दिवस त्वचेची सौम्य आणि नियमित काळजी घेणे महत्त्वाचे आहे. | All Photos : AI Generated