पनीरच्या नावाने काही वेगळंच तर खात नाही ना? 'या' गोष्टी नक्की तपासा
किशोरी घायवट-उबाळे
पनीरचा रंग पाहा - अस्सल पनीर साधारण क्रीम-व्हाइट किंवा किंचित ऑफ-व्हाइट दिसते. खूपच चमकदार पांढरा रंग संशयास्पद ठरू शकतो.
वासावरून अंदाज घ्या - खऱ्या पनीरला ताज्या दुधासारखा नैसर्गिक वास येतो. सोया किंवा पाम तेलासारखा वास जाणवल्यास सावध राहा.
पनीरचा पोत तपासा - अस्सल पनीर मऊ, किंचित घट्ट आणि थोडेसे क्रम्बल होणारे असते. रबरी किंवा अतिशय स्पंजी पोत संशय निर्माण करू शकतो.
फोर्क टेस्ट करा - काट्याने हलके दाबल्यावर पनीर थोडेसे तुटून किंवा चुरगळून गेले तर ते नैसर्गिक असण्याची शक्यता जास्त असते. कारण; रबरी पनीर मात्र सहज तुटत नाही.
चव लक्षात घ्या - अस्सल पनीरला सौम्य, दुधाळ आणि क्रीमी चव असते. वेगळी किंवा कृत्रिम चव जाणवल्यास ते टाळणे चांगले.
शिजवल्यावर काय होते ते पाहा - चांगल्या पनीरने शिजवल्यानंतरही आपला आकार बर्यापैकी टिकवून ठेवला पाहिजे. असामान्यपणे वितळणे किंवा तुटणे संशयास्पद ठरू शकते.
जास्त पाणी सुटतेय का? - पनीर शिजवताना मोठ्या प्रमाणात पाणी सुटत असेल तर त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतो.
खूपच स्वस्त पनीर डिशवर लक्ष ठेवा - इतर हॉटेल किंवा रेस्टॉरंटच्या तुलनेत पनीर डिशची किंमत असामान्यपणे कमी असल्यास वापरल्या जाणाऱ्या पनीरच्या गुणवत्तेबाबत चौकशी करा.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहे. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)