वयाच्या २४व्या वर्षी बंगाली अभिनेत्रीचा मृत्यू; जाणून घ्या कारण...

प्रतिनिधी

प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री एंड्रिला शर्माचे वयाच्या २४व्या वर्षी निधन

कोलकातातील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते

१ नोव्हेंबरला ब्रेन स्ट्रोक आल्याने एंड्रिलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

अहवालात तिच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी असल्याची माहिती समोर आली

अशातच आता तिला हृदयविकाराचे अनेक झटके आले

त्यामुळे तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं

माहितीनुसार, तिला सीपीआर देण्यात आला होता त्यानंतर तिची प्रकृती खूपच नाजूक होती

याच दरम्यान काही दिवसांपूर्वीच एंड्रिलाचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता सब्यसाची चौधरीने सोशल मीडियावर चाहत्यांना तिच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती करत होता

'मी हे इथे लिहीन असं कधीच वाटलं नव्हतं. पण आज ती वेळ आली आहे. एंड्रिलासाठी प्रार्थना करा' असे त्यांनी लिहिले होते.

या आजारातून ती बरी व्हावी यासाठी कुटुंबियांनी खूप पैसा खर्च केला. पण आज तिची रुग्णालयात प्राणजोत मावळली.