Fashion Tips : हे ५ स्कार्फ असतील वॉर्डरोबमध्ये तर, कुठलाही साधा लूक दिसेल रॉयल!
Mayuri Gawade
साधा कुर्ता असो वा कोणताही आउटफिट, त्यावर स्कार्फ घेतल्यावर लूक लगेचच बदलतो. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
स्कार्फ हा फक्त कपड्यांचा भाग नसून तुमच्या लुकला क्लास, ग्रेस आणि स्टाईल देणारा खास फॅशन स्टेटमेंट आहे.
म्हणूनच प्रत्येक मुलीच्या वॉर्डरोबमध्ये हे ५ प्रकारचे स्कार्फ असायलाच हवेत.
शिफॉन स्कार्फ - हलका, कॅरी करायला सोपा आणि नेहमीच्या वापरासाठी परफेक्ट. हा स्कार्फ ब्राइट शेडमध्ये घेतल्यास कुर्त्यावर कॉन्ट्रास्ट लूक मिळतो.
रेशीम स्कार्फ - बनारसी, चंदेरी किंवा सिल्क फॅब्रिकचा स्कार्फ पार्टी लूकसाठी एकदम बेस्ट आहे. तसेच तो एथनिक आऊटफिटला रॉयल टच देतो.
भरतकाम केलेला स्कार्फ - विविधरंगी नक्षीदार स्कार्फ कुठल्याही कुर्त्यासोबत किंवा टॉपसोबत मॅच होतात. गर्दीत उठून दिसण्यासाठी हा एक बेस्ट पर्याय आहे.
हँडपेंटेड स्कार्फ - हँडपेंटेड, कलमकारी वा बांधणी डिझाइनचे स्कार्फ दिसायला हटके असतात. वेगळेपणा हवा असेल तर यापेक्षा चांगला पर्याय नाही.
मल्टीपर्पज स्कार्फ - स्टोलसारखे वापरता येणारे छोटे स्कार्फ जीन्स वा ड्रेसवरही मस्त दिसतात. कॅज्युअल लूकलाही यामुळे स्टायलिश लूक मिळतो.