ट्रेंडी लूकसोबत उंचही दिसायचंय? तर 'या' फॅशन टिप्स नक्की फॉलो करा
किशोरी घायवट-उबाळे
एकसंध रंगांचे कपडे घाला : एकाच रंगाचे किंवा जवळच्या शेड्सचे कपडे उंची वाढल्याचा लूक देतात. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
व्हर्टिकल डिझाईन निवडा : उभ्या पट्ट्या (Vertical Stripes) असलेल्या कपड्यांमुळे उंची जास्त वाटते.
हाय-वेस्ट पँट्स आणि स्कर्ट्स वापरा : हाय-वेस्ट फिटमुळे पाय लांब दिसतात आणि उंची वाढलेली वाटते.
शॉर्ट टॉप्स किंवा टक-इन लुक ठेवा : टॉप आत खोचल्याने बॉडी प्रपोर्शन बॅलन्स होते.
योग्य फूटवेअर निवडा : न्यूड शेड्स, पॉइंटेड शूज किंवा हिल्स असलेले सँडल्समुळे उंची वाढलेली वाटते.
ओव्हरसाइज कपडे टाळा : जास्त सैल कपडे घातल्याने उंची कमी दिसते. तर फिटिंगचे कपडे चांगला लूक देतात.
अॅक्सेसरीज कमी ठेवा : लॉन्ग नेकपीस, स्लिम बेल्ट आणि हलक्या अॅक्सेसरीज उंचीचा भास वाढवतात.
या फॅशन टिप्स वापरून तुम्हाला उंच दिसण्यासाठी मदत होऊ शकेल.