Father's Day 2026 : यंदाचा 'फादर्स डे' कसा साजरा कराल? बाबांसाठी 'या' गोष्टी ठरतील खास

किशोरी घायवट-उबाळे

बाबांसोबत खास वेळ घालवा - फादर्स डेच्या दिवशी मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारा आणि आठवणींना उजाळा द्या. | (सर्व छायाचित्रे :Yandex)
हस्तलिखित पत्र भेट द्या - बाबांबद्दलच्या भावना आणि कृतज्ञता व्यक्त करणारे पत्र त्यांच्यासाठी सर्वात मौल्यवान भेट ठरू शकते.
आवडता पदार्थ बनवा - बाबांचा आवडता नाश्ता, जेवण किंवा गोड पदार्थ घरी बनवून त्यांना खास वाटू द्या.
फॅमिली फोटो अल्बम तयार करा - जुन्या आणि नव्या आठवणींचे फोटो एकत्र करून सुंदर फोटो अल्बम किंवा व्हिडीओ तयार करा.
सरप्राईज आउटिंगचे नियोजन करा - बाबांच्या आवडीच्या ठिकाणी छोटी सहल किंवा डिनरचे नियोजन करून दिवस संस्मरणीय बनवा.
वैयक्तिक भेटवस्तू द्या - त्यांच्या नावाचा मग, फोटो फ्रेम किंवा खास संदेश असलेली भेट देऊन त्यांना खुश करा.
'थँक यू' म्हणायला विसरू नका - कुटुंबासाठी त्यांनी केलेल्या त्यागाबद्दल मनापासून आभार मानून त्यांचा दिवस अधिक खास बनवा.