भारताच्या रणरागिणी! कर्नल सोफिया कुरेशी, ले. कर्नल कृतिका पाटीलसह १० वाघिणींना Femina चा ‘सलाम’, स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष सन्मान

Mayuri Gawade

भारत ७९वा स्वातंत्र्यदिन साजरा करताना फेमिनाच्या ऑगस्ट २०२५ च्या कव्हरवर भारतीय लष्करातील १० शूर महिलांचा सन्मान करण्यात आला आहे. | Insta : feminaindia
देशाच्या विविध कोपऱ्यातून आलेल्या या रणरागिणींनी शौर्य, समर्पण आणि चिकाटीने केवळ लष्करात नव्हे, तर संपूर्ण देशाच्या इतिहासात अमिट ठसा उमटवला आहे. | Insta : feminaindia
कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofiya Qureshi) युनायटेड नेशन्समध्ये इतिहास रचत २०१६ मध्ये मल्टिनॅशनल मिलिटरी एक्सरसाइजचं नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी या पहिल्या भारतीय महिला अधिकारी ठरल्या. देशाच्या लष्करी क्षमतेचं जागतिक स्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या त्या आजही अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी आदर्श आहेत. | Insta : feminaindia
कर्नल मेघना दवे (Colonel Meghna Dave) भारतीय लष्कराच्या ईशान्य विभागातील लॉजिस्टिक्स आणि ट्रान्सपोर्ट बटालियनचं नेतृत्व करणाऱ्या कर्नल मेघना दवे यांनी “भयावर मात करण्यासाठी तयारी, ज्ञान आणि कृती हाच खरा मार्ग” हा संदेश आपल्या कार्यातून सिद्ध केला आहे. | Insta : feminaindia
कर्नल पोनुंग डोमिंग (Colonel Ponung Doming) अरुणाचल प्रदेशातील पहिली महिला कर्नल ठरलेल्या पोनुंग डोमिंग यांनी बॉर्डर रोड्स टास्क फोर्सचं कमांड करताना शिस्त, जिद्द आणि समर्पणाचं अद्वितीय उदाहरण दिलं. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना ‘सेना मेडल’ आणि दोनदा आर्मी कमांडरचं प्रशस्तिपत्र मिळालं आहे. | Insta : feminaindia
कर्नल अंशु जामवाल(Colonel Anshu Jamwal) भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स रेजिमेंटचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कर्नल अंशू जामवाल यांनी आपत्कालिन परिस्थितीतही आपल्या टीमला साथ देत कार्यक्षेत्रात नवा मापदंड निर्माण केला आहे. | Insta : feminaindia
मेजर द्विपन्निता कलिता (Major Dwipannita Kalita) आसामची पहिली महिला पॅराट्रूपर म्हणून मेजर द्विपन्निता कलिता यांनी वैद्यकीय सेवेतून लष्करी सेवेकडे वाटचाल करत धैर्य, चिकाटी आणि सेवाभावाची नवी व्याख्या घडवली आहे. | Insta : feminaindia
कॅप्टन ओजस्विता श्री (Captain Ojaswita Shree) २०१९ मध्ये एअर डिफेन्स कॉर्प्समध्ये रुजू झालेल्या कॅप्टन ओजस्विता श्री यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केलं की पुरूष किंवा स्त्री असल्याने नव्हे तर तुमचं व्यक्तिमत्त्व, व्यावसायिकता आणि कामाप्रती असलेली निष्ठा तुम्हाला तुमच्या सैन्यात आणि सहकाऱ्यांकडून आदर मिळवून देते. | Insta : feminaindia
लान्स नाईक आशिका (Lance Naik Aashika) लष्करी पोलिस दलातील शूरवीर लान्स नाईक आशिका या जम्मू-काश्मीरमधील दहशतवादविरोधी क्षेत्रात तैनात आहेत. त्यांच्या धाडसी कामगिरीसाठी त्यांना इंडियन आर्मीचं प्रशस्तिपत्र प्राप्त झालं आहे. | Insta : feminaindia
लान्स नाईक मंजू (Lance Naik Manju) लान्स नाईक मंजू, १०,००० फूट उंचीवरून स्कायडाइव्ह करून भारतीय लष्करातील पहिली महिला स्कायडायव्हर ठरल्या आहेत. त्यांनी केवळ साहस दाखवले नाही, तर संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) मोहिमेत योगदान देऊन भारताचा जागतिक स्तरावर गौरव वाढवला आहे. | Insta : feminaindia
कॅप्टन श्रद्धा शिवडवकर (Captain Shraddha Shivdavkar) आर्मी एव्हिएशन कॉर्प्समधील तिसरी महिला हेलिकॉप्टर पायलट आणि प्रतिष्ठित ‘चित्ता स्क्वॉड्रन’ (Cheetah Squadron) मध्ये सामील होणारी पहिली महिला ठरून कॅप्टन श्रद्धा शिवडवकर यांनी इतिहास रचला आहे. | Insta : feminaindia
लेफ्टनंट कर्नल कृतिका पाटील (Lieutenant Colonel Krutika Patil) ३२ पदकांची मानकरी आणि घोडेस्वारीत राष्ट्रीय विजेती असलेल्या लेफ्टनंट कर्नल कृतिका पाटील या एनडीएमध्ये इक्विटेशन टीमचं नेतृत्व करत तरुण कॅडेट्सना साहस, शिस्त आणि आत्मविश्वासाचा धडा शिकवत आहेत. | Insta : feminaindia