Fitness Tips : फक्त १ किलोमीटर वॉक; पण शरीराला मिळतात जबरदस्त फायदे!
Mayuri Gawade
रोज फक्त १ किलोमीटर चालण्याची सवयही फिटनेसच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकते.
तज्ज्ञांच्या मते, १ किलोमीटर चालल्याने साधारण ६० ते १०० कॅलरीज बर्न होऊ शकतात.
वजन, वय, उंची आणि चालण्याचा वेग यानुसार कॅलरीज बर्न होण्याचे प्रमाण बदलते.
वेगाने किंवा ब्रिस्क वॉक केल्यास शरीर अधिक ऊर्जा खर्च करते आणि जास्त कॅलरीज जळतात.
वजन कमी करण्यासाठी चालण्यासोबत संतुलित आहार आणि चांगला मेटाबॉलिझमही तितकाच महत्त्वाचा असतो.
दररोज चालल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.
नियमित वॉकमुळे तणाव कमी होतो, मूड चांगला राहतो आणि मानसिक आरोग्यालाही फायदा होतो.
पचनक्रिया सुधारण्यापासून ते चांगली झोप लागण्यापर्यंत, रोजची चालण्याची सवय अनेक फायदे देते. | All Photo : AI Generated