जिमशिवायही राहा फिट! दररोज स्वतःला द्या फक्त २० मिनिटं; जाणून घ्या सोप्या ट्रिक्स

किशोरी घायवट-उबाळे

स्ट्रेचिंग : एक्सरसाइज केल्यावर स्ट्रेचिंग करा. बॉडी मूव्हमेंटसाठी, मसल्स रिलॅक्स होण्यासाठी ५ ते १० मिनिटे स्ट्रेचिंग करणे आवश्यक आहे. | (सर्व छायाचित्रे: Yandex)
शांत झोप : झोपेची गुणवत्ता फिट राहण्यासाठी महत्त्वाची आहे. कमीत कमी ७ ते ८ तास झोप घ्या.
हेल्दी डाएट : एक्सरसाइजसह संतुलित आहार महत्त्वाचा आहे. म्हणूनच, फास्ट फूड टाळा आणि घरचे हेल्दी फूड आहारात घ्या.
बॉडी पॉश्चर (Body Posture) : स्टेजवर किंवा ऑफिसमध्ये काम करताना बॉडी पॉश्चर योग्य ठेवा. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखी, मानदुखी आणि थकवा वाढू शकतो.
एरोबिक/कार्डिओ : शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी कार्डिओ एक्सरसाइज करा. रोज २० ते ३० मिनिटे चालणे, जॉगिंग किंवा जम्पिंग जॅक फायदेशीर ठरेल.
मनाची शांती : मेडिटेशन करा. कारण फिटनेससाठी फक्त बॉडी हेल्थ नाही तर मेंटल हेल्थही महत्त्वाची आहे.
(Disclaimer: यामध्ये दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)