डायबिटीजने त्रस्त आहात? मग आजच 'हे' पदार्थ टाळा, ठरेल फायदेशीर
Krantee V. Kale
मधुमेह हा योग्य आहार आणि जीवनशैली सुधारून नियंत्रित केला जाऊ शकतो. मधुमेही रुग्णांसाठी काही गोष्टी खाणं हानिकारक ठरु शकतं, म्हणून मधुमेही रुग्णांनी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत, जाणून घ्या.
| All Photos/Yandex
केक, बिस्किटे, चॉकलेट आणि साखरयुक्त पेये हे मधुमेहासाठी सर्वात हानिकारक पदार्थ आहेत. यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणामध्ये अचानक वाढ होऊ शकते.
फ्रेंच फ्राईज, समोसे, पिझ्झा आणि बर्गरमध्ये तेल आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि वजन वाढू शकते.
ब्रेड, पास्ता आणि बेकरीसारख्या रिफाइंड पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळीचे प्रमाण झपाट्याने वाढते.
फळांचे रस आणि ड्रायफ्रुट्स आरोग्यदायी असले तरी,यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. फळांच्या रसाऐवजी संपूर्ण फळे खा आणि ड्रायफ्रुट्स मर्यादित प्रमाणात खा.
चिप्स,पॅकेज्ड स्नॅक्स आणि रेडी-टू-ईट पदार्थांमध्ये साखर, सोडियम आणि ट्रान्स फॅटचे प्रमाण जास्त असते यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू होऊ शकते.
मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा.तसेच दररोज कमीत कमी ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा.