केस गळतायत? आहारात 'हे' पदार्थ जरूर ठेवा
Mayuri Gawade
शाम्पू केल्यानंतर बाथरूमच्या फरशीवर खूप केस दिसतात? केस गळण्याची समस्या कमी करायची असेल तर आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा.
केस पुसताना किंवा विंचरताना मोठा पुंजका हातात येतोय? केसांची मुळं मजबूत करण्यासाठी योग्य पोषण मिळणं गरजेचं आहे.
महागडे प्रॉडक्ट्स वापरण्यापेक्षा रोजच्या आहारात काही पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. यामुळे केस गळण्याची समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते.
आवळा : व्हिटॅमिन C आणि लोहाचा उत्तम स्रोत. ताजा आवळा किंवा आवळ्याचा ज्यूस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
पालक : लोह, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध. नियमित पालक खाल्ल्याने केसांना आवश्यक पोषण मिळण्यास मदत होते.
नाचणी : कॅल्शियम आणि पौष्टिक घटकांचा खजिना. नाचणीचे पदार्थ नियमित खाल्ल्याने केस मजबूत राहण्यास मदत होऊ शकते.
काळे तीळ : केसांच्या वाढीसाठी आणि मुळांना बळकटी देण्यासाठी उपयुक्त मानले जातात. रोज थोड्या प्रमाणात काळे तीळ खा.
कढीपत्ता : रोजच्या आहारात कढीपत्ता ठेवा. तसेच कढीपत्त्याचे तेल केसांना लावल्यासही फायदा होऊ शकतो.
अक्रोड : ओमेगा-३ फॅटी अॅसिड्सने समृद्ध. दररोज २ अक्रोड खाल्ल्याने केसांच्या आरोग्याला आधार मिळू शकतो.
केस मोठ्या प्रमाणात गळत असतील किंवा दीर्घकाळ समस्या कायम असेल, तर त्वचारोगतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. | All Photo : Ai Generated