गॅस, ॲसिडिटीचा त्रास होतोय? सकाळी रिकाम्या पोटी हे पदार्थ टाळा
Mayuri Gawade
सकाळी रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने आम्लपित्त आणि पचनाच्या समस्या वाढू शकतात.
संत्री, लिंबू यांसारखी लिंबूवर्गीय फळे रिकाम्या पोटी खाल्ल्यास ॲसिडिटी वाढू शकते.
कच्च्या भाज्या किंवा सॅलड सकाळी खाल्ल्याने गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.
रिकाम्या पोटी कॉफी पिल्याने पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते.
गोड पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते.
कच्चा टोमॅटो रिकाम्या पोटी खाल्ल्यास छातीत जळजळ होऊ शकते.
थंड दही सकाळी खाल्ल्याने काहींमध्ये पचनक्रिया मंदावू शकते.
पॅकबंद फळांचे रस रिकाम्या पोटी घेतल्यास पोटावर परिणाम होऊ शकतो.
दिवसाची सुरुवात हलक्या आणि सहज पचणाऱ्या आहाराने करणे अधिक फायदेशीर ठरते. | All Photos : Ai Generate