दिवसभर राहाल ताजेतवाने, फक्त झोपण्यापूर्वी करा हे छोटं काम!

Mayuri Gawade

दिवसाभराच्या कामानंतर पायांची १०–१५ मिनिटांची मालिश शरीर आणि मनाला ताजेतवाने करते. | सर्व छायाचित्र : पिंटरेस्ट
हलक्या हाताने केलेली पायांची मालिश ताण, थकवा आणि झोपेच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
आपल्या पायांमध्ये अनेक प्रेशर पॉइंट्स असतात, ज्यामुळे मालिश केल्यावर संपूर्ण शरीराला आराम मिळतो.
झोपण्यापूर्वी काही मिनिटे पायांची मालिश केल्याने झोप पटकन लागते आणि शरीर हलकं वाटतं.
ताणामुळे होणारे हार्मोनल असंतुलन पायांची नियमित मालिश करून कमी करता येते.
पायांची मालिश मूड स्विंग आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय ठरते.
जास्त वेळ उभं राहिल्याने किंवा उंच टाचांच्या चपला घातल्याने होणारी सूज आणि वेदना मालिशमुळे कमी होतात.
मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि पाय हलके, ऊर्जावान वाटतात.
तेल किंवा लोशन वापरून केलेली पायांची मालिश त्वचेला ओलावा देते आणि पायांना मऊ, तजेलदार ठेवते.
इथे दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.