केसांची चांगली वाढ होण्यासाठी, असे बनवा घरच्या घरी Herbal Hair Oil

Kkhushi Niramish

केसांच्या उत्तम वाढीसाठी घरच्या घरी Herbal Hair Oil बनवू शकता. त्यासाठी 250 मिली नारळ तेल 150 मिली एरंडेल तेल मूठभर कढीपत्ता एक मोठा चमचा मेथी दाणे एक मोठा चमचा कलोंजीच्या बिया एक छोटी वाटी कापलेला कांदा हे साहित्य आवश्यक असते. सर्वप्रथम मेथी दाणे भाजून घ्या.
मेथी दाणे भाजल्यानंतर कलोंजीच्या बिया भाजून घ्या. लक्षात घ्या कलोंजीच्या बियांना कांद्याच्या बिया म्हणण्याचा गैरसमज आहे. बाजारातून विकत घेताना कलोंजीच्या बिया असेच सांगावे.
मेथी दाणे आणि कलोंजीच्या बिया दोन्ही एकत्रित करून मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
कढई किंवा पॅनमध्ये खोबरेल तेल घाला. कोणतेही आयुर्वेदिक तेल बनवण्यासाठी खोबरेल तेल हाच बेस असतो.
आता त्यात एरंडेल तेल अॅड करा. एरंडेल तेल हे केसांच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
दोन्ही तेल गरम झाल्यावर त्यामध्ये बारीक केलेले मेथी दाणे आणि कलोंजीची पावडर टाका.
नंतर त्यात कढीपत्ता टाका. कढीपत्ता स्वच्छ धुवून वाळवून ठेवलेला असावा. लक्षात घ्या कढीपत्त्यावर कोणतेही ठिपके पडलेले नसावे. कढीपत्त्याची हिरवीगार पाने असावी. कढीपत्त्यात A,B,C, आणि E अशी चार जीवनसत्वे असतात. त्यामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि मॅग्नेशियम यासारख्या खनिजांनी कढीपत्ता समृद्ध आहे.
या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा टाका. कांद्यामुळे केसांची वाढ होते. अनेक वेळा कांद्याचा रस केसांमध्ये लावून केस धुतले जातात.
हे मिश्रण चांगले उकळू द्या.
मिश्रण उकळल्यानंतर थोडे गार होऊ द्या. नंतर गाळणी किंवा अतिशय बारीक जाळीदार कापडाने ते बाटलीत गाळून घ्या.
अशा प्रकारे बाटलीत गाळून घेतलेले हे तेल दररोज रात्री केसांच्या मुळ्यांना लावून मालीश केल्यास निश्चितच केस वाढतात.