वारंवार पोट दुखतंय? दुर्लक्ष करु नका; असू शकतो पोटाचा कर्करोग

Krantee V. Kale

पोटाचा कर्करोग, ज्याला गॅस्ट्रिक कर्करोग असेही म्हणतात. जेव्हा पोटाच्या पेशी असामान्यपणे वाढून ट्यूमर बनवतात तेव्हा पोटाचा कर्करोग होण्याचा धोका वाढतो. | All Photos- yandex
पोटाचा कर्करोग असल्यास शरीरात काही लक्षणे दिसून येतात. याकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.
जर एखाद्या व्यक्तीला बराच काळ छातीत जळजळ किंवा अपचन होत असेल तर हे पोटाच्या कर्करोगाचे महत्त्वाचे लक्षण असू शकते.
जर थोडेसे खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटत असेल तर हे देखील पोटाच्या कर्करोगाचे लक्षण असू शकते.
अचानक वजन कमी होणे किंवा भूक न लागणे हे पोटाच्या कर्करोगाचे संकेत असू शकतात. म्हणून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटाच्या वरच्या भागात वेदना होणे किंवा काहीही खाल्ल्यानंतर पोटात दुखणे हे पोटाच्या कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकते.
खाल्ल्यानंतर उलट्या होणे किंवा उलट्यांमध्ये रक्त येणे हे पोटाच्या कर्करोगाचे गंभीर लक्षण आहे. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका.
कोणतेही काम न करता किंवा आराम करुनही थकवा जाणवत असेल तर हे सामान्य नसून कर्करोगाचे लक्षण असू शकते.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. नवशक्ति’ यातून कोणताही दावा करत नाही.)