पावसाळ्यात मिळणारा ओला खजूर आहे पोषणाचा खजिना! 'हे' फायदे कदाचित तुम्हाला माहिती नसतील

Mayuri Gawade

पावसाळ्यात बाजारात ताजा ओला खजूर मोठ्या प्रमाणात मिळतो. गोड-किंचित तुरट चवीचा हा खजूर काही काळासाठीच उपलब्ध असतो, त्यामुळे या दिवसांत तो आहारात नक्की समाविष्ट करून पाहा.
ओला खजूर चवीसोबतच पोषक घटकांनीही समृद्ध असतो. यात फायबर, प्रोटीन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह आणि इतर महत्त्वाचे पोषक घटक मिळतात.
ओल्या खजुरात कॅरोटीनॉयड्स आणि फेनोलिक्ससारखे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीराला ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण मिळण्यास मदत होऊ शकते.
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे ॲलर्जी, त्वचेची खाज किंवा इन्फेक्शनसारख्या तक्रारी वाढू शकतात. अशावेळी पोषक आहाराचा भाग म्हणून ओला खजूर खाऊ शकता.
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनीही ओल्या खजुराच्या सेवनाबाबत माहिती शेअर केली आहे. त्यांच्या माहितीनुसार, काही आरोग्यविषयक स्थितींमध्ये तो आहारात समाविष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
हिमोग्लोबिनची पातळी कमी असणाऱ्यांसाठीही ओला खजूर आहारातील पोषक पर्याय ठरू शकतो. जेवणानंतर मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन करता येते.
ओल्या खजुरात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीनेही तो संतुलित आहाराचा भाग ठरू शकतो.
ओल्या खजुरातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पोषक घटक आहेत. त्यामुळे हाडांना आवश्यक पोषण देण्यासाठीही त्याचा आहारात समावेश करता येतो.
चविष्ट आणि पौष्टिक असा हा हंगामी खजूर थोड्याच काळासाठी बाजारात मिळतो. त्यामुळे उपलब्ध असताना योग्य प्रमाणात खा आणि रोजच्या आहारात पौष्टिक पर्याय वाढवा. | All Photos : AI Generated