फक्त द्राक्षेच नाही, 'या' फळांपासूनही बनते दारू

Suraj Sakunde

द्राक्षांपासून बनणारी दारू देशात तसेच परदेशात प्रसिद्ध आहे. फ्रूट वाईनमध्ये सर्वात जास्त द्राक्षांचा वापर केला जातो. | FPJ
द्राक्षांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं द्राक्षांपासून बनलेल्या वाईनची चव इतर वाईनच्या तुलनेत परफेक्ट मानली जाते. | FPJ
पण तुम्हाला माहिती आहे का की, फक्त द्राक्षेच नाही तर इतर फळांपासूनही वाईन तसेच दारू बनवली जाते. | FPJ
चीनमध्ये आढळणाऱ्या लीची या फळापासून दारू बनवली जाते. | FPJ
चेरी हे लोकप्रिय फळ असून क्रोएशिया आणि डेन्मार्क मध्ये त्यापासून वाईन तयार केली जाते. | FPJ
कोरिया आणि जपानमध्ये प्लम वाईन बनवली जाते. | FPJ
दक्षिण पूर्व आशियाई देशांत अननसापासून दारू बनवली जाते. | FPJ
इस्रायलमध्ये डाळींबापासून वाईन बनवली जाते. तिला रिमोन असं म्हणतात. | FPJ
भारतात केळीपासूनही वाईन तयार केली जाते. ती जगभरात प्रसिद्ध आहे. | FPJ
याशिवाय आंबा, काजू इत्यादीपासूनही वाईन बनवली जाते. | FPJ