Full Sleeves Blouse Designs : लांब बाह्यांच्या ब्लाऊजची फॅशन पुन्हा ट्रेंडमध्ये; साडीसोबत ट्राय करा 'या' स्टायलिश डिझाइन्स

Mayuri Gawade

साडीला एलिगंट आणि स्टायलिश लूक देणारे लाँग स्लीव्ह्ज ब्लाऊज पुन्हा ट्रेंडमध्ये आले असून, क्लासिकपासून पफ आणि शीअर डिझाइन्सपर्यंत अनेक पर्याय सध्या लोकप्रिय होत आहेत.
लग्नसमारंभ, सण किंवा खास कार्यक्रमासाठी साडीचा लूक अधिक एलिगंट करायचा असेल तर हे ट्रेंडी डिझाइन्स नक्की ट्राय करू शकता.
कलमकारी फुल स्लीव्ह्ज - साध्या किंवा प्लेन साडीला उठावदार लूक द्यायचा असेल तर प्रिंटेड कलमकारी फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज उत्तम पर्याय ठरू शकतो. स्कॅलप किंवा स्वीटहार्ट नेकलाइनमुळे हा लूक आणखी आकर्षक दिसतो.
क्लासिक प्लेन फुल स्लीव्ह्ज- कॉन्ट्रास्ट रंगाचा साधा फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज साडीला एलिगंट आणि रॉयल टच देतो. अशा ब्लाऊजसोबत स्टेटमेंट चोकर किंवा पारंपरिक दागिने छान खुलून दिसतात.
स्क्वेअर नेक आणि डिझायनर कफ- ब्राइट रंग, स्क्वेअर नेकलाइन आणि मनगटाजवळ नक्षीकाम असलेले फुल स्लीव्ह्ज डिझाइन सण-समारंभासाठी परफेक्ट ठरू शकते. प्लेन किंवा जिओमेट्रिक साडीसोबत हा ब्लाऊज विशेष उठून दिसतो.
शीअर फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज- हलके पारदर्शक फॅब्रिक आणि छोटे गोल्डन मोटिफ्स असलेला फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज मॉडर्न तसेच ग्रेसफुल लूक देतो. डीप V नेकलाइनमुळे पारंपरिक साडीलाही स्टायलिश ट्विस्ट मिळतो.
बॉर्डर डिटेलिंग असलेला रॉयल ब्लाऊज - साडीच्या बॉर्डरशी मॅच होणारे कफ आणि ब्लाऊजवरील विणकाम संपूर्ण लूकला रिच फिनिश देते. सिल्क किंवा बनारसी साडीसाठी अशा प्रकारचा फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज खास दिसतो.
स्वीटहार्ट नेक फुल स्लीव्ह्ज - फिटेड फुल स्लीव्ह्ज आणि स्वीटहार्ट नेकलाइन हे कॉम्बिनेशन सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. सिक्विन, नेट किंवा हलक्या पार्टीवेअर साडीसोबत कॉन्ट्रास्ट ब्लाऊज ट्राय करता येईल.
स्टेटमेंट पफ स्लीव्ह्ज - फुल स्लीव्ह्जमध्ये थोडा ड्रामॅटिक लूक हवा असेल तर पफ किंवा बलून स्लीव्ह्ज निवडा. साध्या साडीला फॅशनेबल आणि ग्लॅमरस टच देण्यासाठी हे डिझाइन छान पर्याय आहे. | छायाचित्रे : पिंटरेस्ट