गायत्री दातारची पतीसोबत पॅरिसमध्ये धमाल! आयफेल टॉवरसमोरील रोमँटिक फोटोंनी वेधले लक्ष

Mayuri Gawade

‘तुला पाहते रे’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून अभिनेत्री गायत्री दातार घराघरांत पोहोचली. या मालिकेतील ईशा या भूमिकेमुळे तिला विशेष लोकप्रियता मिळाली.
अभिनयासोबतच गायत्री दातार सोशल मीडियावरही सक्रिय असते. ती आपल्या कामासह वैयक्तिक आयुष्यातील खास क्षण आणि प्रवासाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
गायत्री दातार सध्या पती श्रीकांत चवरे याच्यासोबत पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या सहलीतील काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पॅरिसमधील प्रसिद्ध आयफेल टॉवरसमोर गायत्री आणि श्रीकांत यांनी रोमँटिक फोटो काढले आहेत. एका फोटोमध्ये दोघांनी हातांनी हृदयाचा आकार तयार करून त्यामधून आयफेल टॉवरचे दृश्य टिपले आहे.
या सहलीदरम्यान गायत्रीने आयफेल टॉवरचे विविध फोटोही काढले आहेत. पॅरिसमधील या प्रसिद्ध पर्यटनस्थळाचे सुंदर दृश्य तिच्या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
गायत्रीने पॅरिसमधील 'लव्ह लॉक'चे फोटोही शेअर केले आहेत. प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या कुलपांवर जोडपी आपली नावे लिहितात. या सहलीतील हा फोटोही लक्ष वेधून घेत आहे.
आयफेल टॉवरसमोर गायत्री आणि श्रीकांत यांनी एक सुंदर सेल्फीही काढला आहे. दोघांनी गॉगल घातले असून, फोटोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत आहे.
पॅरिसमधील फोटो शेअर करताना गायत्रीने 'Eiffel in love again in Paris' असे कॅप्शन दिले आहे. या जोडप्याच्या फोटोंना सोशल मीडियावर चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
All Photos : Instagram | Gayatri Datar