हिरव्या नऊवारीत गायत्री दातारचा सुंदर अंदाज!
विजयादशमी आणि दसऱ्यानिमित्त अभिनेत्री गायत्री दातारने खास पारंपरिक लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लाल डिझायनर ब्लाऊजने वाढवली लूकची शोभा!
हिरव्या नऊवारी साडीला गायत्रीने लाल रंगाच्या आकर्षक डिझायनर ब्लाऊजची जोड दिली आहे.
सोनेरी दागिन्यांनी खुललं सौंदर्य! पारंपरिक लूकला उठाव देण्यासाठी गायत्रीने सोनेरी दागिने परिधान केले आहेत.
हिरव्या बांगड्या अन् नाकात नथ!
हातातील हिरव्या बांगड्या आणि नाकातील नथ यामुळे तिच्या मराठमोळ्या लूकमध्ये खास पारंपरिक रंग भरला आहे.
कपाळावरील चंद्रकोरीने वेधलं लक्ष! कपाळावर छोटी चंद्रकोर आणि केसांची सैल वेणी अशा साध्या पण आकर्षक स्टाइलमध्ये गायत्री दिसत आहे.
पारंपरिक लूकसोबत दिला विचारांचा संदेश! गायत्रीने केवळ आपल्या सणासुदीच्या लूकनेच नव्हे, तर सोशल मीडियावरील पोस्टमधूनही चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
प्रत्येक स्त्रीचा माणूस म्हणून सन्मान करा!
देवीची पूजा करण्यासोबत प्रत्येक स्त्रीच्या स्वातंत्र्याचा आणि सन्मानाचा आदर करण्याचा महत्त्वाचा संदेश तिने दिला आहे.
प्रत्येक मुलगी निर्भयपणे घराबाहेर पडावी!
प्रत्येक मुलगी निर्भयपणे घराबाहेर पडून सुखरूप घरी परतेल, तोच खऱ्या अर्थाने विजय असल्याचं गायत्रीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिच्या या संदेशाला चाहत्यांकडूनही पसंती मिळत आहे.