गोल्डन-ऑफव्हाइट लूकमध्ये जिनिलीयाचा रॉयल अंदाज; गजरा अन् झुमक्यांनी वाढवली शोभा
किशोरी घायवट-उबाळे
अभिनेत्री जिनिलीया देशमुखने तिच्या खास एथनिक लूकचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर्स अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ब्रँडच्या ४० वर्षांच्या उत्सवानिमित्त जिनिलीयाने हा खास लूक केला.
गोल्डन आणि ऑफ-व्हाइट रंगाच्या भरतकाम केलेल्या पोशाखात जिनिलीया कमालीची सुंदर दिसत आहे.
ड्रेसवरील नाजूक नक्षीकाम आणि आकर्षक बॉर्डरने या रॉयल लूकमध्ये आणखी भर घातली आहे.
मॅचिंग दुपट्ट्यावरही सुंदर एम्ब्रॉयडरी आणि बारकावे पाहायला मिळत आहेत.
जिनिलीयाने या लूकसोबत पारंपरिक झुमके आणि नाजूक दागिने परिधान करून लूक पूर्ण केला आहे.
केसांची वेणी, त्यावरील गजरा आणि पारंपरिक हेअर ॲक्सेसरीने तिचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
जिनिलीयाचा हा रॉयल एथनिक अवतार सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून, तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.