'घर... माणसं... सुख...' गौरी नलावडेचा गणेशोत्सवातील सोज्वळ लूक; पाहा Photos
किशोरी घायवट-उबाळे
"घर. माणसं. सुख. Week full of love and मोदक” अशी खास कॅप्शन देत अभिनेत्री गौरी नलावडेने गणेशोत्सवातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
गणेशोत्सवाच्या आनंदात रमलेल्या गौरीचा या फोटोंमधील साधा आणि प्रसन्न अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
गौरीने यावेळी निळ्या रंगाची सुंदर काठपदराची साडी नेसली असून त्यावर स्लीव्हलेस गुलाबी ब्लाऊज परिधान केला आहे.
निळ्या साडीला कॉन्ट्रास्ट देणाऱ्या गुलाबी ब्लाऊजमुळे तिचा संपूर्ण लूक अधिक खुलून दिसत आहे.
केसांचा आकर्षक अंबाडा बांधून त्यावर मोगऱ्याचा गजरा माळत गौरीने आपल्या लूकला पारंपरिक टच दिला आहे.
गळ्यातील नाजूक नेकलेस आणि मिनिमल दागिन्यांमुळे तिचा लूक साधा, सुंदर आणि मोहक दिसत आहे.
बाप्पाच्या उत्सवातील आनंद, घरच्यांसोबतचे क्षण आणि मोदकांचा गोडवा या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
गौरीचा हा साधेपणात खुललेला मराठमोळा लूक चाहत्यांना चांगलाच भावला असून सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.