गजरा, झुमके अन् बनारसी साडी; 'घरोघरी मातीच्या चुली' फेम प्रतिक्षा मुणगेकरचा पारंपरिक अंदाज, पाहा Photos

किशोरी घायवट-उबाळे

स्टार प्रवाहवरील 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेत प्रतिक्षा मुणगेकर 'ऐश्वर्या'ची नकारात्मक भूमिका साकारत असून तिच्या अभिनयाला पसंती मिळत आहे. | (All Photos - Instagram/@ pratikshamungekar05)
प्रतिक्षाने नुकतेच केलेल्या खास फोटोशूटमधील आकर्षक छायाचित्रांनी सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
या फोटोशूटसाठी तिने पिवळ्या रंगाची सॉफ्ट बनारसी साडी परिधान करत पारंपरिक आणि एलिगंट लूक साकारला आहे.
हिरव्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि साडीची सुंदर रंगसंगती तिच्या लूकला वेगळीच स्टाईल देताना दिसते.
हलका मेकअप, अंबाडा, झुमके आणि मोगऱ्याच्या गजऱ्यामुळे प्रतिक्षाचा पारंपरिक लूक अधिकच उठून दिसत आहे.
प्रतिक्षाच्या या मोहक फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत तिच्या स्टाइलचे भरभरून कौतुक केले आहे.