आले कसे आहे आरोग्यासाठी चांगले? जाणून घ्या फायदे

Swapnil S

आल्यामध्ये एंजाइम असते. हे एंजाइम पचनसंस्था सुरळीत करते. आले तुम्ही चहात टाकू शकता त्याने घसा चांगला, क्लिअर होतो. सर्दीत आल्याचा चहा चुकवू नये. पोटासाठी उत्तम असणाऱ्या आल्यामुळे गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या होत नाहीत. | PM
आल्याने सर्दी खोकला टाळला जातो. आले उग्र असते. आल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो कारण आल्याने साखरेची पातळी नियंत्रित होते. आल्यामुळे संधिवातापासून आराम मिळतो कारण यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. | PM
आलं खाल्ल्याने तणाव कमी होतो परिणामी मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तुमचा मूड खराब असेक तुम्हाला कसला ताण असेल तर तुम्ही आल्याचा कडक चहा पिऊन बघा. | PM
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असते. अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. आल्याचा वापर तुम्ही कशातही करू शकता. आल्याचं सेवन तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता. | PM
आल्यात व्हिटॅमिन सी असते. हे व्हिटॅमिन रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. व्हिटॅमिन सी त्वचेसाठी सुद्धा चांगले असते. आल्यामुळे आपल्या शरीराची रोगांशी लढण्याची क्षमता वाढते. व्हिटॅमिन-सीचा हा चांगला स्रोत आहे. | PM