Ginger Tea Tips : आल्याचा चहा होईल एकदम कडक अन् टेस्टी; फक्त करा 'हे' बदल
किशोरी घायवट-उबाळे
अनेकांना सकाळी गरमागरम आणि कडक आल्याचा चहा प्यायला आवडतो. मात्र, चहामध्ये आलं घालूनही त्याला हवा तसा स्वाद आणि झणझणीतपणा येत नाही.
चहा अधिक कडक आणि चविष्ट बनवायचा असेल, तर सर्वात आधी आल्याचा वापर योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे.
आलं किसून घाला : आल्याचे मोठे तुकडे घालण्याऐवजी ते बारीक किसून किंवा ठेचून चहामध्ये घाला. त्यामुळे त्याचा रस आणि स्वाद चहात चांगला उतरतो.
आलं आधी पाण्यात उकळा : चहासाठी दूध घालण्यापूर्वी पाण्यात आलं टाकून काही मिनिटं चांगलं उकळा. यामुळे आल्याचा तिखटसर स्वाद पाण्यात उतरतो.
झाकण ठेवून उकळा : आलं घातल्यानंतर भांड्यावर काही वेळ झाकण ठेवा. यामुळे आल्याचा सुगंध आणि स्वाद चहात टिकून राहण्यास मदत होते.
आलं आणि चहा पावडर एकत्र उकळा : आल्यासोबत चहा पावडरही पाण्यात घालून थोडा वेळ उकळल्यास चहाला छान रंग आणि कडकपणा येतो.
दुधाचं प्रमाण योग्य ठेवा : चहा खूप दुधाळ केल्यास आल्याची चव कमी जाणवू शकते. त्यामुळे पाणी आणि दुधाचं प्रमाण योग्य ठेवणं महत्त्वाचं आहे.
थोडा वेळ मंद आचेवर उकळा : दूध घातल्यानंतर चहा मंद आचेवर एक-दोन उकळ्या येईपर्यंत शिजवा. यामुळे चहाला छान चव येते. मात्र, जास्त वेळ उकळल्यास चहा कडवट होऊ शकतो.
(Disclaimer: यामध्ये दिलेली माहिती सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)