Girija Oak London Vacation : गिरिजा ओकची लंडनमध्ये भटकंती; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

किशोरी घायवट-उबाळे

मराठी आणि हिंदी मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री गिरिजा ओक सध्या लंडनमध्ये फिरण्याचा आनंद घेत आहे.
अभिनयासोबतच आपल्या साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे चर्चेत असलेल्या गिरिजाने लंडन व्हॅकेशनचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये गिरिजाचा कॅज्युअल आणि स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे.
पिवळ्या रंगाच्या टाॅपमधील तिचे हावभाव लक्ष वेधून घेत आहे.
लंडनच्या ऐतिहासिक वास्तू आणि सुंदर रस्त्यांच्या पार्श्वभूमीवर गिरिजाने अनेक छान क्षण कॅमेऱ्यात टिपले आहेत.
गिरिजाने या फोटो मालिकेला London Londoning like London Londons! अशी मजेशीर कॅप्शन दिली आहे.
शहरातील वातावरणाचा आनंद घेताना ती अगदी प्रसन्न दिसत आहे.
गिरीजा ओकच्या फोटोंमध्ये तिच्या नोजपिनने चाहत्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं असून, तिच्या साध्या पण आकर्षक स्टाइलचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
या सहलीत गिरीजाने मैत्रिणींसोबत लंडनच्या सुंदर ठिकाणी भटकंती करत निवांत क्षणांचा आनंद लुटला.
या ट्रिपमध्ये तिची नणंद आणि अभिनेत्री मृण्मयी गोडबोलेही तिच्यासोबत असून, दोघींच्या एकत्रित फोटोंनी व्हॅकेशन आणखी खास केल्याचे दिसत आहे.
तिच्या या फोटोंमधून लंडनमधील निवांत भटकंती आणि सुट्टीचा आनंद अनुभवायला मिळतो.
गिरिजाचे हे खास व्हॅकेशन फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असून तिच्या लूकचीही चर्चा होत आहे.
(सर्व छायाचित्र : Instagram/ Girija Oak)